सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील खंडाळी प्रभागातील उमेद अभियाना अंतर्गत सुनेगाव शेंद्री येथे स्थापन झालेल्या राजमाता ग्रामसंघाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी फुले यांच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ग्राम संघाचे अध्यक्ष लताबाई काटे, सचिव अर्चना जाधव,कोषाध्यक्ष सारिका जायभाये, सी.आर.पी धनश्री काळे, बचत गटाच्या अध्यक्षा ललिता जायभाये, जनाबाईं काळेकाळे, सदस्य मनीषा जायभाये, इनुबाई जाधव, सीता जायभाये, सुप्रिया जाधव, चंद्रभागा जायभाये, अंगणवाडी सेविका सागरबाई जायभाये, मदतनीस सुगमता जायभाये तसेच प्रभाग समन्वयक नारायण करांडे आदिंची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!