स्त्री जीवनाला आकार देणारी एक रचनात्मक शक्ती म्हणजे माई सावित्री – बालाजी तुरेवाले

स्त्री जीवनाला आकार देणारी एक रचनात्मक शक्ती म्हणजे माई सावित्री - बालाजी तुरेवाले

अहमदपूर (गोविंद काळे) : महिलांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारी व स्त्री जीवनाला आकार देणारी एक रचनात्मक शक्ती म्हणजे माई सावित्री असे मत राज्य आदर्श शिक्षक बालाजी तुरेवाले यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक बालाजी तुरेवाले, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उध्दव श्रृंगारे उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर विद्यालयात आज 3 जानेवारी 2021 रोजी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन मार्गदर्शन घेण्यात आले. प्रथमतः शाळेचा विद्यार्थी श्रेयश सावरगावकर याने स्वागत गीताने उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले प्रमुख मार्गदर्शक बालाजी तुरेवाले यांनी पुढे बोलताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे बालपण व त्यांचे जीवन कार्य, शिक्षण व सावित्रीबाई फुले यांचे घट्ट नातं, समाज सुधारणे बरोबर त्यांचे काव्य संग्रह लेखन साहित्य इत्यादी बाबत त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. या ऑनलाइन वेबिनारस जवळपास 100 पालकांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले सूत्रसंचालन संगिता आबंदे यांनी केले. तर आभार सतीश साबणे यांनी मानले व ञिगुणा मोरगे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author