अमोल ढोरसिंगे एक उत्कृष्ट, सक्रीय सामाजिक कार्य जोपासणारा जाणकार
औराद (भगवान जाधव) : औराद हे एक कर्नाटक, महाराष्ट्र राज्याच्या सिमेवर असलेले एक मोठे गाव आहे आणी या गावात पुर्वीपासुनच कोणत्या ना कोणत्या पक्षाची चांगली राजकीय पार्श्वभूमी तयार होते व या गावातील ग्रामपंचायत मोठी आहे त्यामुळे या गावात चांगली बाजारपेठ ही आहे आणि या गावांमध्ये अनेक दिवसापासून मोठी बाजारपेठ असल्याने सीमावर्ती भागातील भरपूर लोक येत असतात पण या गावात फक्त राजकीय स्वरूपा मधून कामे होत असल्याने सामाजिक कामांना फारशी तेवढे महत्त्व येत नाही पण या गावात असाही एक युवक सक्रिय सामाजिक कामांमध्ये सतत अग्रेसर असतो त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे आणि त्याने केलेल्या कामाला कधी प्रसिद्धीही मिळाली नाही त्यामुळे त्याचे काम सतत पडद्यावर राहिल्यामुळे हा युवक कधीच प्रसिद्धीमध्ये आलेला नाही.
अमोल ढोरसिंगे हा एक असा युवक आहे ज्याचे वडिलांचे छत्र तो वयाच्या ३ ते ४ वर्षे असतानाच वडिल अपघातात निधन झाले तेव्हा पासुन आज वयाच्या २० व्या वर्षापर्यंत चुलते आणी मामा यांनी केलेल्या अर्थीक मदतीने बारावीपर्यंत चे शिक्षण घेतले. पुढे पदवीचे शिक्षण घेत असताना घरात अर्थीक अडचणी जाणवत असल्याने आणी लहान बहीनीचे लग्णाचे ओझे सतावत असल्याने आणी कौटुंबिक उपजिवीका भागविण्यासाठी अर्धवट पदवीचे शिक्षण सोडुन देऊन कामाचा शोध सुरु केला.
सुरुवातीला दुकानामध्ये नोकरी करण्यासाठी घरातुन दबाव येत होते पण त्यानंतरही अमोल ने तहसील कार्यालयात निलंगा येथे २०१० मध्ये रुद्राणी इंन्फोटेक यांच्या सेतु केंद्राकडुन आधार कार्ड बनविण्यासाठी ४०००/- पगार पण जाण्या येण्याचा स्वतः चा खर्च करावा लागला पण तेथे गेल्यानंतर आपल्या गावातील अनेक लोकांच्या कामे करुन देण्यासाठी मदत होत असल्याचा आनंद मिळत असल्यामुळे अमोलने ती नोकरी जवळपास सहा महिने केली. नंतर ग्रामपंचायत कार्यालयात संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अंतर्गत बोरसुरी येथे २०११ साली ऑपरेटर म्हणून नियुक्ती झाली आणी पण सामाजिक कामाची आवड असल्याने अमोल ने चांगल्या कामामुळे तेथील अनेक लोकांच्या मनात घर केले आणी अमोल च्या शेतात गावातील सांडपाण्याची नाली शेतात जाऊन नुकसान होत असल्याने अर्थीक फटका बसत होता म्हणुन अमोलने ग्रामपंचायत औरादच्या ग्रामसेकांना माहीतीचा अधिकार अर्ज करुन सदरील नाली बंद करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्यामुळे ग्रामपंचायत च्या अनेक चुका अमोलच्या लक्षात येऊ लागल्या आणी त्याच चुका जनतेसमोर येत असल्याने आणी बोरसुरी कांही तरुण रेशन दुकानदार राशन व्यवस्थित देत नसल्याची चर्चा केली आणी अमोलने तेथील तरुणांनी अमोलचे मार्गदर्शन घेत असल्याचे ग्रामसेवक व येथील ग्रामपंचायत सदस्यांना ही गोष्ट खटकली आणि २०१४ मध्ये अमोल ला बोरसुरी येथून ती नोकरी सोडावी लागली.
नंतर याच सामाजिक कामाचा फायदा अमोल ला झाला आणी अमोल ने सुरुवातीला पोलीस फ्लॅश न्युज या साप्ताहिक पेपला वार्ताहार म्हणुन दोन वर्षे काम केले आणी गावातील अनेक गोरगरीब लोकांच्या अडीअडचणी सोडवित असल्याचे फळ मिळाले नंतर दैनिक सामना पेपरचा वार्ताहार झाल्यानंतर तर अमोलने आपल्याकडे आलेल्या प्रत्येक तक्रारी पेपर च्या माध्यमातून प्रकाशित करुन न्याय तर मिळवुन दिला पण तालुक्यातील तहसील कार्यालय , पंचायत समिती , न्यायालय अशा अनेक कार्यालयात जाऊन लोकांना मदत केली आणी न्याय मिळवुन देत राहिल्यामुळे अमोल ला जनतेत एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता समजुन लोक आकर्षित होऊ लागले.
तसेच अमोलने बस्थानकात तरुण मुलांना सोबत घेऊन बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची अडचण आसल्यामुळे सलग दोन वर्षे पाणपोई सुरु करुन पिण्याच्या पाण्याची सोय केली. तसेच गावात अनेक भागातील अडीअडचणी दैनिकाच्या माध्यमातून प्रशासनाच्या समोर आनुन दिल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अमोलने सक्रिय सहभागी होऊन त्यांच्यासारखे चांगले तरुण समाजात तयार करावे अशी जनतेतुन अपेक्षा व्यक्त होत आहे.