हॅकरचे लक्ष्य समाज माध्यमातील बड्या प्रोफाईलवर, अनेक प्रोफाईल बनावट 

हॅकरचे लक्ष्य समाज माध्यमातील बड्या प्रोफाईलवर, अनेक प्रोफाईल बनावट 

पुणे (केशव नवले) : संगणक तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेवून अनेकांची लुबाडणुक केली जाते आहे.प्रोफाईल हॅक करणे, बनावट प्रोफाईल बनऊन फसवणे असे प्रकार वाढवे आहेत,जवळपास एक हजार सहाशे जणांनी सायबर सेलकडे या संदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत. समाजमाध्यमात अनेकांची सक्रियता वाढली आहे.अगदी शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिकही समाजमाध्यमावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. 
विविध प्रकारच्या समाजमाध्यमांचा तरुणाईकडून मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमातील खाते हॅक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अगदी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून सामान्य नागरिकांना हॅकिंग तसेच बनावट खाते तयार करण्यात आल्याच्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. सर्वाधिक बनावट प्रोफाईल फेसबुकवर केले जात असून त्याद्वारे नागरिकांकडे पैसेही मागितले जात आहेत. एखाद्या व्यक्तीच्या नावे  बनावट खाते तयार करून त्याच्या निकटवर्तीयांकडे पैसे मागितले जात आहेत. गेल्या दीड वर्षांत पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याकडे खाते हॅक केल्याच्या ८०३ तक्रारी तसेच बनावट प्रोफाईलच्या १६०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी त्याचे खाते हॅक केले जात आहे. त्याआधारे अश्लील छायाचित्रे, चित्रफिती संबंधित व्यक्तीच्या खात्यावर अपलोड केल्या जातात. प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट खाते तयार करून त्या व्यक्तीच्या निकटवर्तीयांना मैत्रीची विनंती पाठविली जाते. त्यानंतर त्या समाजमाध्यमातील खात्यातील संदेश सुविधेद्वारे निकटवर्तीयांकडे पैसे मागितले जातात. काही जण शहानिशा न करता त्वरित अ‍ॅपद्वारे पैसे पाठवितात. गेल्या काही दिवसात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांपासून ते नेतेमंडळींचे बनावट खाते उच्चपदस्थ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच नेतेमंडळींच्या नावाने बनावट खाते उघडण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत.नागरिकांनी समाज माध्यमांचा जपून वापर करावा,पैशाची मागणी समाज माध्यमावरून होत असेल तर अगोदर शहानिशा करावी.असे आवाहन सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author