दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर!

दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर!

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत निस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणा-या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगीकृत कामास प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव व्हावा या दृष्टीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यावर्षी दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील उत्कृष्ट स्वंयसेविका कु.प्रिया बाबुराव साळुंके व उत्कृष्ट स्वंयसेवक म्हणून तानाजी सर्जेराव बडे या विद्यार्थ्यास जाहीर करण्यात आला आहे. तसेच शै.वर्ष 2019-2020 मधील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.सुप्रिया मधुसुदन पाटील या विद्यार्थीनीस उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेविका पुरस्कार जाहीर करण्यात आला.

विद्यापीठा अंतर्गत जिल्हा समन्वयकाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या निवड समितीच्या माध्यमातून त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललीतभाई शहा, रमेशकुमारजी राठी, सचिव रमेशजी बियाणी,संयुक्त्‍ सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष कदम, डॉ.सुनिता सांगोले, डॉ.मच्छिंद्र खंडागेळे, माजी कार्यक्रमाधिकारी डॉ.संतोष पाटील, डॉ.अंजली जोशी, डॉ. शिवकुमार राऊतराव, प्रा.महेश जंगापल्ले, प्रा.संदीप जगदाळे, प्रा.विलास कोमटवाड, कार्यालयीन अधिक्षक श्री.नवनाथ भालेराव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author