भाजयुमो लातूर तालुका नुतन पदाधिकार्यांना आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चाच्या लातूर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकार्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदधिकार्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध निवडणूका होणार असल्याने भाजपाच्या जिल्हा अध्यक्षपदी आ. रमेशअप्पा कराड यांची निवड झाल्यापासून त्यांनी जिल्हाभरात कुठेही कसलीही गटबाजी राहता कामा नये याची दक्षता घेवून सर्वांना सोबत घेत भाजपाची संघटनात्मक मजबुत बांधणी करीत आहेत. लातूर जिल्हा हा भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला पुन्हा सिध्द करण्यासाठी पक्ष पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी जिद्दीने कार्यरत रहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
लातूर तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या नव्याने नियुक्त केलेल्या सरचिटणीस समाधान कदम, वैभव मगर, हणमंत गव्हाणे उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, शुभम खासे, चिटणीस किरण मुंडे, शंकर चव्हाण, संघटक ईश्वर बुलबुले, कोषाध्यक्ष बालाजी गवळी, कार्यालय प्रमुख पांडूरंग शिंदे, प्रसिध्दी प्रमुख अक्षय भोसले आदींना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते मंगळवारी नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अॅड. धनराज शिंदे, पंस. भाजपा गटनेते भैरवनाथ पिसाळ, माजी जिप सदस्य काशिनाथ ढगे, चिंचोली ब. येथील सरपंच विश्वास कावळे, गाधवडचे सरपंच साहेबराव क्षीरसागर, किशोर काटे, रवी मगर यांच्या अनेकजण उपस्थित होते.