केंद्र सरकारने अचानक घोषित केलेल्या स्टॉक लिमीट व जाचक अटी रद्द कराव्यात

केंद्र सरकारने अचानक घोषित केलेल्या स्टॉक लिमीट व जाचक अटी रद्द कराव्यात

आडत व्यापाऱ्यांच्या मागणीमुळे आमदार बाबासाहेब पाटील यांचे निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्र सरकारने दाळी वरील विविध प्रतिबंधक नियम अचानक घोषित केलेल्या स्टॉक लिमीट व जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील व आडत व्यापाऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दि १३ जुलै रोजी देण्यात आले. वरिल विषयी सविस्तर माहीती अशी की, मागील एक महिण्यापासून केंद्र सरकारने दाळी वरील विविध प्रतिबंधक नियम घोषित केलेले आहेत. 2 जुलै रोजी केंद्राने अचानक चना, तुर, उडीद व इतर काही वस्तूवर साठवणूक मर्यादेचा कायदा जाहिर केलेला आहे. परंतू या वस्तूंचे दर एम.एस.पी.च्या खाली आहेत . बऱ्याच राज्यांनी या कायद्यास विरोध केला आहे. हा कायदा जर लागू झाला तर शेतकरी, छोटे व्यापारी दाळ उत्पादक कंपनी यांचे खूप मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे . तरी राजस्थान सरकारच्या धरतीवर हा कायदा महाराष्ट्रात लागू करु नये असे निवेदन तहसीलदार यांना आमदार बासाहेब पाटील यांनी दिले असुन सदरील निवेदनावर आडत व्यापारी अनिल मेनकुदळे, डी.के जाधव, श्यामसुंदर सोनी, संतोष कोडगीरे, दत्तात्रय दराडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. केंद्र सरकारने दाळी वरील विविध प्रतिबंधक नियम घोषित केले असल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आडत व्यापारी यांनी निषेध म्हणून आपली बाजार पेठ दि ५ जुलै पासुन बंद ठेवली आहे.
यावेळी जि.प सदस्य माधव जाधव, युवक जिल्हा कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, व्यंकट वंगे, श्याम देवकत्ते, गणेश मुस्तापुरे, अनिल बेंबडे, चंद्रकांत परतवाघ, अवधुत पाटील,गोपीनाथ जायभाये, गोपाळ काळे, राम जायभाये, भगनुरे आदींची उपस्थिती होती

About The Author