शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ महत्त्वाचे – महादेव कसगावडे
अहमदपूर येथे बास्केट बॉल लीगचे उद्घाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : लॉकडाउनच्या काळात मागील सहा महिन्यापासून पालकांचेच घरा बाहेर पडणे बंद झाल्यामुळे मुले मैदानापासून कोसो दूर आहेत शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ महत्त्वाचे असून आता तरी पालकांनी मुलांना मैदाना वरती पाठवावे त्याद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास होईल असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी महात्मा गांधी महाविद्यालयच्या वतीने आयोजित मुला मुलींचे बास्केट बॉल प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. किशनराव बेंडकुळे हे होते पुढे बोलताना क्रीडा अधिकारी म्हणाले की महात्मा गांधी महाविद्यालया सारख्या गुणवत्ता देणाऱ्या महाविद्यालयाने खेळाची ही जपवणूक याच पद्धतीने केली आहे त्यासाठी व्यवस्थापन व संबंधित शिक्षक यांनी मोलाचे काम केले आहे ग्रामीण भागात बास्केट बॉल सारख्या खेळांना चालना देणे ही चांगली गोष्ट असून त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळाविषयी गोडी निर्माण होते असेही ते म्हणाले यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू भाग्यश्री बिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदरील बास्केट बॉलच्या स्पर्धेमध्ये बारा संघानी भाग घेतला असून खेळाडू पहिली ते आठवी या वयो गटातील असून विविध शाळांचे विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गटाला वेगवेगळी नावे दिले असून त्यांच्यासाठी ड्रेस कोड दिला आहे सदरील सामने विद्युत प्रकाश झोतात दिवस-रात्र पद्धतीने करण्यात येणार असून चार जानेवारी रोजी अंतिम सामना होणार आहे या कार्यक्रमात पालक म्हणून प्रा विश्वंभर स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विचार विकास मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. शिवसांब चवंडा अॅड वसंतराव फड न.प चे मुख्याधिकारी त्रंबक कांबळे छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते शिक्षक बाबुराव नलवाड, धरमपाल गायकवाड, दत्ता गलाले, आशिष हेंगणे, शेखर चौधरी, नजीर पठाण, राहुल गादेवार आदी उपस्थित होते पंच म्हणून वैभव चेंडके, गणेश पवार काम पाहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम पलमटे व तृप्ती गादेवार केले तर आभार शरद माने यांनी मानले.