राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी
लातूर (प्रतिनिधी) : खरे तर सावित्रीबाईंचे जीवन सर्वांसाठीच रोल मॉडेल आहे. एक महान शिक्षणतज्ज्ञ, समाजकार्यकर्ता, कवयित्री, पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिक, संप घडवणारी पहिली स्त्री, सत्यशोधक समाजाची कार्यकर्ती अशा विविध भूमिका सावित्रीबाईंनी एकाच आयुष्यात यशस्वी करून आपल्यासाठी खूप मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांचे हे सोशल इंजिनीअरिंग आजच्या काळात आदर्श वाटल्यावाचून राहत नाही, २०२१ साल उजाडलेय. जग बरेच बदललेय. स्त्री विश्वात तर प्रचंड बदल झालाय. स्त्रियांचे जगणे बदलवण्यात सिंहाचा वाटा असलेले एक जगणे आपण कसे विसरणार? जसजसे दिवस जाताहेत तसतसे ते जगणे मनात पुसट होण्याऐवजी आणखी आणखी गडद होत जातेय. मुलींना शाळेत शिकवायला जाण्यासाठी पहिले पाऊल उचलले, तेव्हा व्यवस्थेने त्यांच्या अंगावर फेकलेल्या शेणाची, खरकट्याची, दगड-धोंड्याची त्यांनी फुले केलीत हा इतिहास आपल्याला माहीत आहे, या विचारांची जाणीव ठेवत आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने उद्याच्या उज्वल भवितव्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, असा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला शिक्षक दिन राज्यभर साजरा करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई कदम, काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर स्मिता खानापुरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनिता चाळक, नगरसेविका सपना किसवे, महापुरे ताई यांच्या प्रमुख उपस्थितीत लातू्र शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उच्च शिक्षीत
डॉ.सुनिता सांगोले, सुरेखा मस्के, शुभांगी पिसाळ, शैलेजा वारद, डॉ.सुवर्णा जाधव, उषा सुरकुटे, मंजूषा लातूरकर, शोभा माने, वनिस केदार, बबिता सोळंके, अनिता खडके, पठाण असरिन या महिलांचा सन्मान चिन्ह, पुष्पहार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डी.उमाकांत, राणा पाटील, अंकित कदम, सरिता पवार, मधुबाई शिंदे, कालिंदा सुर्यवंशी, शिला काशिकर, सुरेखा पाटील, सरोजा पाटील, टेकाळे ताई, अमर कदम यांचे सहकार्य लाभले.