बाळांना न्यूमोनिया पासून संरक्षणासाठी न्युमोकोकल लस द्या – डाॅ.तेलगाणे
उदगीर (प्रतिनिधी ) : लहान बाळांला न्युमोकोकल न्यूमोनिया आजारा पासुन संरक्षणासाठी पालकांनी आपल्या बाळास न्यूमोकोकल कॅनज्यूगेट लसीकरण करू घ्यावे. असे आवाहन. सुप्रसिद्ध तज्ञ डॉ.शारडकुमार तेलगाणे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. व्ही. पवार यांनी केली आहे. सोमवारी लसीकरणाची सुरुवात लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय उदगीर येथे करण्यात आली . न्यूमोकोकल न्युमोनियान हा न्यूमोकोकाय बॅक्टेरिया मुळे होणारा आजार आहे, या मध्ये 0ते05 वर्ष वयोगटातील बालके बाधित होतात. तसेच Oते02 वर्ष वयोगटातील मुले दगावण्याचे प्रमाण अधिक असते. यामध्ये कान फुटणे, सायनोसायटिस उदभवणे, न्यूमोनिया होणे, मेंदू ज्वर होणे यासारखे आजार होतात.
हा आजार होऊ नये यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे . त्यामुळे न्यूमोकोकल कॉन्ज्यूगेट ही लस बाळाला दिली जाणार आहे. एका बाळाला तीन डोस दिले जातात, पहिला डोस सहा आठवडे, दुसरा डोस 14 आठवडे, तिसरा डोस नऊ महिन्यानंतर द्यावा लागतो. पूर्वी ही लस खाजगी रुग्णालयात उपलब्ध होती आता ही सर्व सरकारी रुग्णालयात मोफत मिळणार आहे. सामान्य रुग्णालय उदगीर येथे सद्यस्थितीत कोवीड रुग्णालय असल्यामुळे सदर लसीकरण लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय उदगीर येथे दर सोमवार व गुरुवार या दिवशी सकाळी 9 ते 2 या वेळेत दिली जाईल. उदगीर शहरात वार्ड निहाय लसीकरण सत्र महिन्यातून एक वेळेस आयोजित केले जाते. वार्ड निहाय लसीकरणासाठी पालकांनी आपल्या वॉर्डातील अशा कर्मचारी, ए एन एम यांच्याशी संपर्क साधावा. सर्व पालकांनी आपल्या बाळाला न्यूमोकोकल कॉनज्यूगेट ही लस देऊन आपल्या बाळाचे न्युमोकोकल न्यूमोनिया या आजारापासून संरक्षण करावे. असे आव्हान डा.शरद तेळगाणे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ डि. व्हि. पवार, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राम शेट्टी यांनी केले आहे.