सिद्धी शुगर कारखान्या विषयी बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी एखादा कारखाना चालवुन दाखवावा

सिद्धी शुगर कारखान्या विषयी बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी एखादा कारखाना चालवुन दाखवावा

चेअरमन आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर साखर कारखाना हा आम्ही डबघाईला आणला नाही. सन 2011 मध्ये टेंडर निघाले त्या नंतरच नियमानुसार व योग्य किंमतीला विकत घेतला असून पुराव्यानिशी बोलणे योग्य असल्याचे सांगून सिद्धी शुगर वरती बिनबुडाचे व दिशाभूल करणारे आरोप केल्याचे सिद्धी शुगर चे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार बाबासाहेब पाटील, जि.प.सदस्य मंचकराव पाटील, माधवराव जाधव जि. प.सदस्य, सिद्धी शुगर चे व्यवस्थापक पी.जी.होनराव, प्रशांत भोसले, श्याम पाटील , शिवानंद हेंगणे, अनिल बेंबडे ,शिवाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चेअरमन बाबासाहेब पाटील म्हणाले की किशनराव देशमुख यांनी कारखान्याची मशिनरी ही खूप चांगली आणली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा संचालक त्यावेळी निवडून आले होते, तरीही चेअरमन आम्ही न होता ती संधी इतरांना दिली. कारखाना योग्य चालविण्यात आला नव्हता, कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त घेण्यात आली होती. त्या कारखाण्याची क्षमता 2500 टनाची असून हा कारखाना अवसायनात निघाला. यामुळे शेतकऱ्यांची शेअर्स बुडीत निघाल्याचे यावेळी सांगितले. ते म्हणाले बालाघाट साखर कारखाना टेंडर निघाल्या नंतरच तो आम्ही योग्य किंमतीला विकत घेतला असल्याचे सांगून कारखान्याचा वजन काटा ही योग्य व बरोबर आहे. ज्या वजनकाट्यावर ऊस घेतला जातो त्याच वजन काट्यावर कारखान्याची साखर वजन करून विक्री केली जात असल्याचे सांगितले. वजन काट्यावर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आल्याचे चेअरमन पाटील यांनी यावेळी सांगितले.
रेणा – मांजरा परिसरातील ऊस 14 ते 15 महिन्यांना तोडला जातो. यामुळे तेथील रिकव्हरी रेट खूप जास्त असल्याचे सांगून या कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही यावर्षी अकराशे कोटी रुपये बिल दिल्याचे सांगितले. यामुळे तालुक्यात विकासाची कामे होत आहेत.शेतकऱ्याकडील पैसा हा मार्केटमध्ये येत असल्याचे सांगितले.
पूर्वीच्या कार्य काळात बालाघाट साखर कारखाने मुंबई बँकेचे तेरा कोटी 41 लाख रुपये कर्ज उचलले होते. त्याच्या नोटीस आता येत असल्याचे सांगून विरोधकांनी नवीन कारखाना काढून स्पर्धेत उतरून शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचेही यावेळी सिद्धी शुगर चे चेअरमन तथा आ. बाबासाहेब पाटील यांनी बोलून दाखविले.

About The Author