भारतीय साहित्याचा महामेरू महाकवी कालिदास – डॉ प्रशांत बिरादार

भारतीय साहित्याचा महामेरू महाकवी कालिदास - डॉ प्रशांत बिरादार

अहमदपुर (गोविंद काळे) : संस्कृत चे महाकवि कालिदास यांच्या अलौकीक काव्य प्रतिभेने भारतीय साहित्याची मान संपूर्ण जगात उंचावते. महाकवी कालिदास भारतीय साहित्याचे महामेरू होते असे प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले . याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आषाढ महिण्याचा प्रथम दिवशी महाकवी कालिदास यांची जयंती साजरी केली जाते . या दिवसाचे औचित्य साधून महात्मा फुले महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने महाकवी कालिदास यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिति होती. याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. प्रशांत बिरादार म्हणाले की, आपल्या अलौकीक काव्य प्रतिभेने कालिदासांनी दोन खंड काव्य व तीन नाटके लिहिली. त्यारचनेतील पात्र उदात झाले असून ते आज ही आपल्या मनावर राज्य करतात कालिदासांनी निसर्गावरील प्रेमांचे चित्रण अप्रतिम कल्पनाशक्तीच्या जोरावर केले आसल्यामूळे कालिदासांचे साहित्य आजरामर सिद्ध झाले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी मेघदूत, कुमारसंभव आदी कालिदास रचित काव्यावर भाष्य करून कालिदासांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी कोवीड -१९ च्या नियमांचे पालन करून महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यलयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author