किनगाव येथे माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा सत्कार संपन्न
किनगाव (गोविंद काळे) : माजी मंत्री विनायकराव पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल किनगाव येथील हाँटेल कोहीनूर येथे विनायकरावजी पाटील यांचा समर्थक खाजाभाई शेख यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. सदरील 51 किलो वजनाचा हार एका जेसीबी च्या साह्याने माजी मंत्री विनायकराव पाटील यांना घालून भव्य असा सत्कार करण्यात आला. खाजा भाई हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून परीचित आहे.माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या वर प्रचंड भक्ती असल्याने खाजाभाईने एक आगळा वेगळ्या पद्धतीने सत्कार करून तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून घेतले. सदरील भव्यदिव्य सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती अँड.आर.डी. शेळके हे होते तर यावेळी व्यासपीठावर किनगाव चे माजी सरपंच विठ्ठलराव बोडके, संग्राम चामे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, पंचायत समितीचे सदस्य कमलाकर पाटील, राजकुमार खंदाडे, निळकंठ पाटील, उद्योजक तथा टाकळगावचे उपसरपंच परमेश्वर घोगरे, राम बोडके, अविनाश चाटे, सुनील वाहूळे, तुकाराम फड,सुनील सर, संभाजी चाटे,रतन सौदागर, रुद्रा मुरकुटे, गौतम शिंदे, बंडू श्रृंगारे, प्रा. नसीर शेख, इंद्रजीत गुट्टे, रवि सिरसाठ, अक्षय लहाने यांच्या सह किनगाव व परीसरातील भाजपचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.