विभागीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत डोंगरगांव आश्रमशाळा प्रथम
उदगीर (एल.पी.उगीले) : सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, लातूर व प्राथमिक आश्रमशाळा नाईकनगर, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने आश्रमशाळा विभागीय क्रिडा स्पर्धा, प्राथमिक आश्रमशाळा नाईकनगर उदगीर येथे पार पडल्या. १७ वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळा जळकोट जि. धाराशिव संघावर मात करून, माध्यमिक आश्रमशाळा सु-डोंगरगांव ता.जळकोट शाळेने बाजी मारली.व विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली या चार जिल्हयातील आश्रमशाळेतील संघ सामिल झाले होते. संघात शेख आयशा (कर्णधार), चंदा निशाद (उपकर्णधार), भांडे रूकसार, वाघमारे प्रतिक्षा, वाघमारे निकीता, डांगे आश्विनी, चंदा रूबीना, जमादार अंजुम, वाघमारे प्रगती, कांबळे राणी, डांगे राजश्री यांचा सहभाग होता. क्रिडा शिक्षक इंगोले जयप्रकाश, संघप्रशिक्षक पठाण कमाल, काकडे आश्विनी, तर संघ मार्गदर्शक पाटील हरीश, राठोड नारायण, प्रा. रविंद्र सानप, गुरूनाथ पवार, चव्हाण अतुल, हाके लक्ष्मण, राठोड सुधाकर, सय्यद जलील, नायके संजीवनी, संञे आत्माराम,विजयी संघासोबत उपस्थित होते. इतर मागास बहुजन कल्याण ,लातूरचे प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांच्या हस्ते संघातील विजयी खेळाडूचा यावेळी गौरव करण्यात आला. संघाच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई राठोड, सचिव गंगाधरजी राठोड,आमदार डाॅ.तुषारजी राठोड, संस्थेचे सदस्य मारोती चव्हाण, माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष जामकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिल कौठेंकर, व्यंकट रामदिनवार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.