राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ५१ जणांचे रक्तदान
उदगीर (एल.पी.उगीले) : राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.विनोद चव्हाण व सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.आशिष कुमार अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उदगीर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षा विषयी, रक्तदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर तर्फे मोटार वाहन निरीक्षक श्री. शांताराम साठे, मोटार वाहन निरीक्षक सहा. श्री.राजकुमार नरसगोंडे, गणेश जाधव व रक्तपेढीचे डॉ.राम पाटील, नर्स शिल्पा चाटे, पीआरओ महेश जवळगे, टेक्निशन बालाजी चौधरी, जया आडे, शासन नियुक्त अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर व उदगीर कार्यालयातील सर्व कर्मचारी, वाहन चालक उपस्थित होते.