लातूरच्या ट्युशन एरियामध्ये पोलिसांचे कोम्बिग ऑपरेशन-अनेकावर कारवाई
लातूर (एल.पी.उगीले) : कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून लातूर पोलीस कार्यरत आहेत. 5 पोलीस अधिकारी आणि 47 पोलीस अंमलदार,वाहनांचा ताफा यांनी एकत्रित येत लातूर येथील ट्युशन एरियामध्ये कोम्बिग ऑपरेशन केले.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात लातूर येथील ट्युशन एरियात पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर व पोलीस अंमलदारांनी दिनांक 21/01/2025 रोजी संध्याकाळी 06 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अचानकपणे कोम्बिग ऑपरेशन केले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे 05 पोलीस अधिकारी, 47 पोलीस अमलदारांनी हे कोंबिंग ऑपरेशन पार पाडले.
लातूर येथील ट्युशन एरियामध्ये कारवाई करत 94 लोकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कार्यवाही करून 83 हजार 250 रुपयाच्या दंड आकारण्यात आला तर 07 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यामध्ये लातूर शहर शैक्षणिक पॅटर्नसाठी ओळखला जातो. राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. लातूर येथील ट्युशन एरियामध्ये यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असते. या ठिकाणी काही असामाजिक तत्त्व सक्रिय होऊ नये,या भागांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर वचक बसावा यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.
ट्युशन एरिया मध्ये अशा स्वरूपाची कारवाई सातत्याने होत असल्यामुळे या भागात गुंडगिरी करणाऱ्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे. या कोम्बिग ऑपरेशन मागचा उद्देश हा संपूर्ण राज्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकसित करता यावी हा असून या नंतर ही अशा प्रकारच्या कारवाया लातूर पोलीस कडून करण्यात येणार आहेत.