इंधन दरवाढ व महागाई विरोधात अहमदपूरात कांग्रेसच्या वतीने सायकल रँली..
अहमदपूर (गोविंद काळे) : पेट्रोल, डीझेल, घरगूती गँस जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली असून ही वाढ दिवसागणिक वाढतच चालली असल्याने ही महागाई सर्वसामान्या न परवडणाऱ्या असून कोवीड 19 मुळे अनेकाची आर्थिक परिस्थिती बदलेली असून अनेकांना नौकरी सोडून घरी रहाण्याची वेळ आली आहे. घर संसाराचा गाडा चालवणे कठीण बनले असल्याने अहमदपूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढ व महागाई विरोधात मंगळवार दि.13 रोजी दीपवर्षा मंगल कार्यालय ते रिलायन्स पेट्रोल पंप सायकल रॅली काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत.तर तरुण कार्यकर्त्यांनी सायकलवरुन रँली काढून सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.
सदरील रँलीमध्ये यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सांब महाजन तालुकाध्यक्ष हेमंत पाटील माजी तालुकाध्यक्ष भारत रेड्डी, जिल्हा नियोजन सदस्य चंद्रकांत मद्दे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शिराज जहागीरदार, शहराध्यक्ष विकास महाजन, ओबीसी तालुकाध्यक्ष लहू शेवाळे, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष प्रकाश ससाने, बाबासाहेब देशमुख, धनराज गिरी, राजू पाटील, दादा देशमुख, सुरेंद्र पाटील, सय्यद मुजमील, सलमान पठाण, शिवाजी जंगापल्ले शहाजीराव पाटील, बंडू येरमे, संदीप गुट्टे, अफरोज पठाण, अशोक माने, सुभाष शेटकर, माधव जाधव, राम नरवटे, प्रमोद उजनकर, शहाजी साखरे, दिनकर कदम, सद्दाम पठाण, रेणुकादास पांचाळ आदींची उपस्थिती होती.