वृक्षांची लागवड करा तरच वातावरण संतुलीत राहील – उपजिल्हाधीकारी मंगशेट्टी
तोंडार (प्रतिनिधी) : सध्यसथित दिवसेंदिवस व्रक्शाची कत्तल मोठया प्रमाणात होत असल्याने वातावरणातील समतोल बिघडत चालले आहेत, यामुळे आज रुग्णाना ऑक्सिजन मिलत नसल्याने कोरोना कालात अनेकांचे प्राण गेले आहेत, त्या मुळे प्रतेक नागरिकानी व्रक्शारोपन करुन झाडे लावा झाडे जगवा तरच वातावरणात समतोल निर्माण होईल असे मत उदगीर चे उपजिल्हाधिकारी प्रविण मंगशेट्टी यानी कुमठा खु येथील व्रक्शारोपन चा कार्यक्रमात व्यक्त केला. या वेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी सरपंच सौ.वर्षा सुनिल केंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रविण मंगशेट्टी उदगीर चे तहसीलदार रामेश्वर गोरे, पं.स.चे गटविकास अधिकारी सुले साहेब मंडल अधिकारी पंडीत जाधव, तलाठी मोरे, ई मान्यवर उपस्थित होते. पुढे गावकर्याना मार्गदर्शन करताना सागितले की पर्यावरण पोषक ठेवण्यासाठी व्रक्शाची अंतयंत गरज आहे, झाडातील जेवढे ऑक्सिजन पोषक असते तेवढे ईतर कशात ही नाही, त्या मुळे प्रतेकानी आपल्या घरात शेतात, कार्यालयात झाडे लावा व त्याचे संगोपन करा, कारण भविष्यात येणार्या रोगराई शी लढण्यासाठी ऑक्सिजन ची अंतयंत गरज आहे, तर होईल तेवढी मेहणत घेउन झाडे लावा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल केंद्रे,उपसरपंच ज्ञानेश्वर पाटिल, सदस्य दिनकर गुरुजी केंद्रे,सिद्धेश्वर केंद्रे, अशोकराव केंद्रे गुरुजी गावातील नागरिक उपस्थित होते.