श्री पांडूरंग विद्यालयात विद्यार्थांचे उत्साहात स्वागत
प्रतिनिधी ( उदगीर ) : शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात मुलांचे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना सुरू केल्या होत्या.त्यानुसार ग्रामीण भागातही शाळा सुरू झाल्या आहेत. गावातील ग्रामपंचायतीने पालकांशी चर्चा करून ठराव करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.तेव्हा मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने त्या कधी सुरू होणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती.15 जुलै रोजी शाळेची घंटा वाजली आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.त्यामुळे संस्थेचे सचिव- विनायकरावजी बेंबडे यांच्या मार्गदर्शनाने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक तसेच शिक्षकाकडून स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर विद्यालयाच्या परिसरातील वृक्षांना इजा पोहचू नये.वैयक्तिक स्वच्छता तसेच विद्यालयाचा परिसर स्वछ ठेवावा.नियमित मास्क वापरावे.सुरक्षित अंतर ठेवावे.आणि वारंवार हात धुण्याच्या सूचनाही विद्यार्थांना देण्यात आल्या.