उदयगिरीतील मराठी विभागाच्या वतीने प्राध्यापकांचा सत्कार

उदयगिरीतील मराठी विभागाच्या वतीने प्राध्यापकांचा सत्कार

उदगीर : ( प्रतिनिधी)  येथील महाराष्ट्र उदयगिरी  महाविद्यालयातील मराठी विभागात प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. राजकुमार मस्के यांनी विभागातील प्राध्यापकाचे कौतुक केले. डॉ. बाळासाहेब दहिफळे यांची प्रोफेसरपदी पदोन्नती झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. आर. तांबोळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ व बुके देऊन करण्यात आला तसेच मराठी विभागातील प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांना राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर  झाल्यामुळे त्यांचाही प्रभारी प्राचार्य डॉ.आर.आर. तांबोळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुधाकर पाटील, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जयप्रकाश पटवारी,  ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार उपस्थित होते. विभागातील डॉ. ए.पी. मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र  तेलंगे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!