चांदेगाव येथे धाडसी दरोडा, 14 तोळे सोने व 11 तोळे चांदी सह लाखोंचा ऐवज लंपास

चांदेगाव येथे धाडसी दरोडा, 14 तोळे सोने व 11 तोळे चांदी सह लाखोंचा ऐवज लंपास

 उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे चांदेगाव येथे प्रताप निवृत्ती मुसने यांच्या घरात रात्री सर्वजण झोपलेले पाहून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला, आणि घरातील लोखंडी कपाट आणि लोखंडी पेटीत ठेवलेल्या सोन्याचे 14 तोळ्याचे दागिने व चांदीचे दहा तोळ्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे, तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या मेहेत्रे यांच्या घरातील चांदीच्या एक तोळ्याच्या तीन अंगठ्या ज्याची किंमत एक हजार आठशे रुपये असे एकूण तीन लाख 92 हजार 800 रुपयांचा चोरट्यांनी लंपास केला आहे. अशी फिर्याद प्रताप निवृत्ती मुसने यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं. 276 /21 कलम 457, 380 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घारगे हे करत आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!