सैनिकी विद्यालयाचा एस एस सी चा निकाल १०० टक्के

सैनिकी विद्यालयाचा एस एस सी चा निकाल १०० टक्के

उदगीर (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील एस एस सी चा निकाल १०० टक्के लागला आहे. दि. १६ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाने इ.१० वी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. या परीक्षेत सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत उज्वल यश संपादन केले आणि १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयातून प्रथम क्रमांक विश्वनाथ दरपूरे (९७ .६०टक्के), व्दितीय प्रतिक कांबळे ( ९४.४० टक्के) तर तृतीय शुभम धुमाळ ( ९२.८० टक्के) यांनी पटकावला आहे. विद्यालयातील सर्वच ८४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संतोष चामले, धनराज काटू, विलास शिंदे, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, संजय निरणे, बालाजी मुस्कावाड, नागेश पंगू, उमाकांत नादरगे, श्रीकांत देवणीकर, दीपक कांबळे, मारोती मारकवाड या सहशिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

सैनिकी विद्यालयातील विश्वनाथ दरपूरे या विद्यार्थ्यांने गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणारे सहशिक्षक यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज म. पाटील नागराळकर, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य, चंदन पाटील नागराळकर, दिलीप पाटील नागराळकर, चेतन पाटील नागराळकर, कमांडंट कमांडर बी के सिंह, प्राचार्य वसंत कुलकर्णी, सीमा मेहत्रे एचओडी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author