सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी.

0
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी.

उदगीर (एल.पी.उगीले)
कुमठा बुद्रुक येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक व विज्ञान विभाग प्रमुख अरुण राठोड यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अशोकराव पेदेवाड, प्राध्यापक बालाजी पटवारी, इतिहास विभाग प्रमुख व्यंकटराव पुठेवाड, दीपक हुचनाळे, ज्ञानेश्वर जवळे, सुरेश पाटील, शालिनीताई बोरसुरीकर, विशाल कदम, शिवाजी सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयप्रकाश माने हे उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख उमाकांत कांबळे यांनी सेवालाल महाराज यांच्या कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप पर्यवेक्षक अरुण राठोड सर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार दिव्या हिने केले तर आभार प्रदर्शन पवार वैष्णवी हिने केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!