दयानंद कला महाविद्यालयाच्या फॅशन विभागाची ईको फ्रेन्डली आर्टीकल्स कार्यशाळा संपन्न

दयानंद कला महाविद्यालयाच्या फॅशन विभागाची ईको फ्रेन्डली आर्टीकल्स कार्यशाळा संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालय येथे १६ जुलै रोजी फॅशन डिझाईन या विभागाच्या वतीने लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ईकोफ्रेंडली आर्टीकल्स या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. घरामध्ये व परिसरामध्ये असणाऱ्या टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तु कशा बनविल्या पाहिजेत या बाबतचे कौशल्य आणि साहित्य इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्या संदर्भातील आवश्यक असलेल्या वस्तुसंदर्भातील माहिती या कार्यशाळेच्या विभागप्रमुख प्रा. सुवर्णा लवंद यांनी दिली. आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु करण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यशाळेत प्रा. हर्षा जैन (पिपाडा) यांनी सौंदर्य प्रसादनांचा पर्यावरण पूरक वस्तुंचा पूर्नवापर (Recycle), वापरलेल्या वस्तुवर प्रक्रीया करून त्याचा पुर्नवापर करणे (Reuse), पर्यावरणाशी निगडीत असलेल्या कमीत कमी (Reduce) वस्तुंचा वापर कसा करायचा याची त्रिसुत्री संकल्पना सविस्तरपणे विषद केली. या वर्कशॉप साठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या कार्यशाळेत फॅशन विभागातील प्रा. पी.के. देशमुख, प्रा. डी.एस. निलावार, प्रा. पी.व्ही. बिराजदार,, प्रा. आर.जे. नाईक, प्रा. एस.टी. हालदार, आणि प्रा. के.एस. बजाज विभागातील सर्व प्राध्यापकांनी वर्कशॉप साठी परिश्रम घेतले.

फॅशन विभागातर्फे आयोजीत कार्यशाळेसाठी दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा आणि महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस.पी. गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.

About The Author