वाहतूक पोलीस कर्मचारी नितीन चौधरी यांची उत्कृष्ट कामगिरी
दिवसभरात केला 66900 रुपयांचा दंड वसूल
पुणे (रफिक शेख) : पुणे जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी नितीन चौधरी यांनी एका दिवसात जवळपास 66900 रुपयांचा दंड वसूल करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
पुणे जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक नितीन चौधरी हे सहकारनगर वाहतूक विभाग पुणे शहर येथे कार्यरत आहेत. नितीन चौधरी यांना दि.17 जुलै रोजी पासलकर चौक, बिबवेवाडी येथे कर्तव्यावर असताना त्यांनी गाडी नंबर एम एच 12 पी पी 6384 या मोटार सायकल वरील इ चलन 34 या वरील एकूण 16200 रु दंड व एम एच 12 सी झेड 4151 या वरील इ चलन 35 वरील एकूण 16700 रु दंड वसूल केला आहे. तसेच त्यांनी पुर्ण दिवसभरात उत्कृष्ट कामगिरी बजावत वेगवेगळ्या वाहनवरील एकूण 66900 रुपये दंड वसूल करत पुणे पोलीस विभागाची मान उंचावली आहे.