स्व. लोणकरच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून आर्थिक मदत
पुणे ( रफिक शेख ) : गुणवत्ता असुन देखिल निसर्गाच्या खेळीमुळे हतबल झालेल्या, एम.पी.एस.सी. ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील दोन वर्षांपासून मुलाखतच न झाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने ३० जून रोजी आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यालाच एकप्रकारे धक्का बसला होता.
या घटनेनंतर राज्य सरकारविरोधात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह जनसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती .
राजकारणाचा भाग म्हणुन विरोधी पक्षाने देखील याचे भांडवल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारला या प्रकरणी धारेवर धरले होते.
अधिवेशनातही हा मुद्दा गाजला.
लोणकर कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत होते
अखेर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणकर कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.
या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विटद्वारे माहिती दिली असून,
सोबत लोणकर कुटुंबीयांची भेट घेतानाचे व त्यांना मदत देतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत.
”एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.