तीन कोटी पंच्याहत्तर लाखाचा गांजा जप्त,पोलीसांची मोठी कारवाई

तीन कोटी पंच्याहत्तर लाखाचा गांजा जप्त,पोलीसांची मोठी कारवाई

पुणे ( रफिक शेख ) : नशाबाजांना अगदी सहज आणि इतर नशेच्या तुलनेत स्वस्त नशा म्हणुन नशेडी गांजाला प्राधान्य देतात,याचाच फायदा घेऊन नशेचा व्यापार करणारे वेळ प्रसंगी परराज्यातून गांजा मागऊन बिनधास्त नशेचा बाजार मांडतात.मात्र पोलिसांच्या हुशारीने नशाबाजांचा डाव उधळला आहे.

पुण्यामध्ये तब्बल १ हजार ८७८ किलोंचा गांजा लपवून आणण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी हाणून पाडला असून या कटात सहभागी असलेल्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. 

या मालाची एकूण किंमत जवळपास ३ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. 

त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा दाखल करण्याची योजना असावी,ती तोंडघशी पडली आहे.  

या प्रकरणी अजून काही लोकांचा समावेश आहे का? याचा आता पुणे पोलीस तपास करत आहेत. 

अननस, जॅक फ्रूटच्या खाली लपवलेला गांजा पुणे-सोलापूर रोडवरून अननस आणि जॅक फ्रूटची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये १ हजार ८७८ किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी राजू गोंधवे, श्रीनिवास पवार, विलास पवार, धर्मराज शिंदे, अभिषेक घावटे आणि विनोद राठोड या सहा जणांना अटक केली आहे. 

आंध्रप्रदेशातून हा  गांजा आणल्याचे सांगण्यात येत आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 

पुणे सोलापूर रोडवरून टी.एस. ०७ यू.ए.ए. ७९७९ या क्रमांकाचा आयशर ट्रक जात होता. या ट्रकमध्ये अननस आणि जॅक फ्रूट होते. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फळांचे ४० बॉक्स आढळले. त्या बॉक्सच्या खाली गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये १ हजार ८७८ किलो गांजा होता. त्याची ३ कोटी ७५ लाख रुपये इतकी किंमत होत 

असल्याचे सांगण्यात आले. 

तर या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.  आंध्रप्रदेशातून हा गांजा आणल्याची माहिती आरौपींनी पोलिसांना दिली आहे. 

या प्रकरणी अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून हे एक मोठे रॅकेट असावे असा संशय पोलीसांना आहे.त्या दृष्टीने त्याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.

About The Author