शिवरायांच्या राज्यात शाहीरांचा सन्मान : ज्ञानेश महाराव
उदगिर (एल.पी.उगीले) : शाहीरांच्या पोवाड्यातून शोर्याचे गोडवे नेहमी गायीले गेले आहेत. या शाहिरांचा छत्रपती शिवरायांनी नेहमीच शाहिरांचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध वक्ते ज्ञानेश महाराव यांचे शाहीरांचे छत्रपती शिवराय या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश बिरादार होते. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे माजी सभापती गोविंद भोपणीकर, अनंत चोंदे, आशिष पाटील राजूरकर, जगद्गुरु संत तुकाराम साहित्य परिषदेचे प्रदेश महासचिव बालाजी जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश वासरे, जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद शेळके, जिजाऊ ब्रिगेड अनिता जाधव, ज्योती ढगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महाराव म्हणाले की,
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राजवटीत समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचा सन्मान करण्याचे काम केले आहे. हे करीत असताना पोवाड्यातून राज्याचा लौकिक वाढविणाऱ्या शाहिराना देखील त्यांनी सन्मानाची वागणूक दिली आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
प्रतिभा मुळे यांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक विवेक सुकणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय महादेव हलगरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन किशनराव बिरादार यांनी केले. आभार अंकुश हुंडेकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी राजकुमार कानवटे, महादेव हलगरे, संतोष बिरादार, विजयकुमार चवळे, भास्कर मोरे, गणपतराव गादगे, संग्राम पताळे, सुजित जाधव, कमलाकर मुळे, सुरेश जाधव, प्रतिभा मुळे, पुष्पा जाधव, आलट, यांनी पुढाकार घेतला.
