इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची सायकल रॅली

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची सायकल रॅली

लातूर/मुरुड (प्रतिनिधी) : कोरोना आजाराची साथ व त्याचे जनसामान्यांच्या अर्थकारणावर झालेले परिणाम पाहता केंद्र सरकारने या देशातील सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असताना सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या पेट्रोल-डिझेल किमतीमध्ये वाढ करून सर्वसामान्य माणसांची लूट चालवली आहे. या दरवाढीविरोधात लातूर ग्रामीण युवक काँग्रेस व मुरुड शहर युवक काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

मोदी सरकारच्या आश्वासनाला भुलून जाणाऱ्या जनतेला सध्या पश्चातापाची वेळ आलेली असून पेट्रोल डिझेलचे अवाजवी दरवाढ झाल्याने सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल डिझेल वरील वाहने घरात लावून पुन्हा सायकल वापरावी लागेल अशी परिस्थिती मोदी सरकारने निर्माण केली आहे. मुरुड येथील आंबेडकर चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी लातुर जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी अभय देशमुख, लातुर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, लातुर ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, लातुर तालुका ओबीसी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्ञानोबा गवळी, मुरूड शहर कॉंग्रेसचे दिपकजी पटाडे, भारत लाड, चंद्रकांत मोरे, मुरूड शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद घुटे, टजगन चव्हाण, अमोल भिसे, दिपक काळे, प्रताप खोसे, गणेश ढगे, विपीन गवरे, रामभाऊ गोरे, संतोष देवकर, भैय्या पिंपरे, उद्धव चव्हाण, बाबा सवासे, हणमंत भोसले, पांडुरंग माने, समाधान गायकवाड, रामानंद जाधव, वैभव पटाडे, आबा पाटोले, पवन सवासे, आदिनाथ पठाडे, पिराजी इटकर, शाम इटकर, किरण धावारे, संजय झाकनिकर व कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होतेे.

About The Author