प्रत्येक गावातील अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठीच शिवसेनेचे शिव संपर्क अभियान – जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
निलंगा (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात गावा गावातील वाडी तांड्यावरील अडीअडचणी समजून घेऊन शासनाचे प्रत्येक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी व अडचणी सोडवण्यासाठी हे शिव संपर्क अभियान राबवण्यात आले असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी ननंद येथे बोलताना सांगितले.
लातुर जिल्ह्यातील प्रत्येक शासन स्तरावरील गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व शासन योजना मिळवुन देण्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी मदत करणार व लोकांना शिवसेनेच्या दिलेल्या वचनपुर्तीचा मान राखन्याचे काम जिल्ह्यातील शिवसेना करणार असल्याचे आजच्या नणंद येथील शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने व तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे हे बोलत होते शिवसेनाप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियान राबवून सर्व शिवसैनिकांनी शासकीय योजनेचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पर्यंत पोहोचवण्यसाठी व अडीअडचणी मध्ये मदत करण्यासाठी एकत्रित राहून संपर्कात राहून मदत करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी संपर्कात राहावे यासाठीच शिवसंपर्क अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात राबवावे व त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील शाखाप्रमुख सहित जिल्हा प्रमुख प्रमुख पर्यंत सर्वांनी एकत्रित येऊन व संपर्कात राहून पक्षवाढ करण्याचे आदेश आल्यानुसार आज नणंद येथे शिवसंपर्क अभियानाची बैठक आयोजित केलेली होती. येथील बैठकीला जनतेने उत्सफुर्तपणे प्रतीसाद दिला या शिवसंपर्क अभियानात जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, तालुका महिला संघटक रेखा पुजारी, निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे व उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य युवासेना जिल्हाप्रमुख अँड. राहुल मातोळकर, तालुका संघटक शिवचरण पाटील, माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील, शिवसेना शहर संघटक हरिभाऊ सगरे युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे निलंगा शहर प्रमुख मुस्तफा शेख व गावातील शिवसैनिक उपस्थित होते.