डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

लातूर (प्रतिनिधी) : आस्था कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. एमआयडीसी परिसरातील आयटी पार्क मध्ये असणार्‍या आस्था कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक किरण भावठाणकर यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना संचालक किरण भावठाणकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरू करण्यावर भर द्यावा असे मत व्यक्त केले.सध्या शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे.त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी स्वबळावर व्यवसाय उभारणीस प्राधान्य देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केंद्रप्रमुख अण्णासाहेब साठे यांनी आस्था कौशल्य विकास केंद्र हे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणारे नामवंत केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गायकवाड तर आभार प्रदर्शन अजय कांबळे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशिक्षक प्रा. सुचेता साठे,सुयोग जोगदंड, सुकेश सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author