सैनिकी विद्यालयाच्या योगेश रायलवाड व आर्यन जाधवचा सत्कार संपन्न.

0
सैनिकी विद्यालयाच्या योगेश रायलवाड व आर्यन जाधवचा सत्कार संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले)
रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान,उदगीर द्वारा आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालयातील योगेश रायलवाड याचा प्रथम क्रमांक तर आर्यन जाधव याचा चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक आला त्यामुळे त्यांचा सत्कार संपन्न झाला.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उदगीर येथे बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील विचारमंचावरील मान्यवर महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर , तहसीलदार राम बोरगावकर ,बी डी ओ सोराडकर साहेब ,घुले साहेब सहाय्यक कामगार उपयुक्त लातूर, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. डॉ. सुशीलकुमार चिमोरे , पत्रकार रसुल पठाण यांच्या हस्ते योगेश रायलवाड याला सातशे रुपये व आर्यन जाधव याला चारशे तीस रुपये रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी इतिहास विषयाचे सहशिक्षक उमाकांत नादरगे उपस्थित होते.
योगेश रायलवाड व आर्यन जाधव या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे व यांचे मार्गदर्शक सहशिक्षक उमाकांत नादरगे , मारोती मारकवाड व प्रल्हाद येवरीकर यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर, शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील नागराळकर, उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, सहसचिव चेतन पाटील नागराळकर, प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख प्रा प्रदीप कोठारे, विभाग प्रमुख संतोष चामले, विलास शिंदे, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!