दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क व गातेगाव पोलिसांची कारवाई

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क व गातेगाव पोलिसांची कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गातेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क व गातेगाव पोलीसांनी एका ओमिनी कारवर छापा टाकून देशी विदेशी दारुसह तब्बल दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, लातूर तालुक्यातील गातेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रामेश्वर ते ताडकी रोडवर एका ओमिनी कारमध्ये देशी व विदेशी दारूचे बॉक्स घेऊन जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली ही माहिती मिळताच गातेगाव पोलीस व राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित या ओमिनी कारवर छापा टाकला असता सदर गाडीमधून देशी व विदेशी दारूचे तब्बल 16 बॉक्स त्याची अंदाजे किंमत 84,192 रुपये तर ओमिनी कारची अंदाजे किंमत 120000 हजार असा एकूण 2,04,192 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यावेळी सदर आरोपी बालाजी भास्कर दुडलवार यास ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई गातेगाव पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एकत्रित केली असून पुढील तपास गातेगाव पोलीस करत आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!