सावित्रीबाई फुलेंचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. याबरोबरच उत्तम कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका, अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. महिलांना शिक्षित करण्याचे कामही त्यांनी केलेले आहे. या बरोबरच महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या काळातही विद्यार्थी व विद्यार्थीनीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करून शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम संस्थेच्यावतीने स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जेएसपीएमचे कार्यकारी संचालक तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, संस्थेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य सचिदानंद जोशी, प्राचार्य जगपाल काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यात मलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि महात्मा ज्येातीबा फुले यांच्या मदतीने हे कार्य पुढे चालु ठेवून महिलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे कामही त्यांनी केेलेले आहे. त्यामुळे महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करताना मनोर्धर्य खचून न जाता. आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे जावे आणि त्या-त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावे, असे मतही त्यांनी यावेळी बोलताना मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जेएसपीएमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य शैलेश कचरे, प्राचार्य गोविंद शिंदे, उपप्राचार्य मारूती सुर्यवंशी, मुख्याध्यापक मोहन खुरदळे, मु.अ.अरूणा कांदे, मु.अ.संजय बिराजदार, मु.अ.सुनिता मुचाटे, मु.अ.कोडीतीवार, मु.अ.बिडवे यांच्यासह शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.