प्रस्तापितांच्या विरोधात उभे राहून कव्हेकरांनी विश्‍व निर्माण केले – माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

प्रस्तापितांच्या विरोधात उभे राहून कव्हेकरांनी विश्‍व निर्माण केले - माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

लातूर (प्रतिनिधी) : भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदारकीपर्यंतचा प्रवास अशी संघर्षमय वाटचाल केलेली आहे. प्रस्तापितांच्या विरोधात संघर्षमय लढा उभारून शिक्षण, सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करून एका आदर्शात्मक विश्‍वाची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

यावेळी ते महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या कार्पोरेट कार्यालयाच्या आयोजित सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते. यावेळी बँकचे तज्ज्ञ संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, बाबासाहेब कोरे, एम.एन.एस.बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, संचालक सुर्यकांतराव शेळके, निळकंठराव पवार, एम.एन.एस.बँकेचे जॉईंट एम.डी. बालासाहेब मोहिते, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव स्वातीताई जाधव, रयत क्रांती संघटनेचे मराठवाठा अध्यक्ष राहूल मोरे, युवा प्रदेशाध्यक्ष पांडूरंग शिंदे, लातूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे, रमेश फटाले, नंदकिशोर सोनी, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून कव्हेकर भाऊंनी केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. बँक चालविणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही त्यांनी हे सहकाराच्या माध्यमातून ते करून दाखविले आहे. याबरोबरच कृषी कायद्याच्या समर्थनात रोखठोक भूमिका घेण्याचे कामही माजी आ.कव्हेकर भाऊंनी चांगल्या पध्दतीने केलेले आहे. तसेच कृषी कायद्याबाबत जनजागृतीसाठी विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी लेखनही केलेले आहे. त्यामुळे असा अभ्यासू अन् मार्गदर्शक व्यक्‍ती पुन्हा एकदा राज्याच्या सभागृहात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केली. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिली. प्रारंभी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्यावतीने बँकेचे चेअरमन तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

About The Author