न्यायालयातील खटला सोडून दे अन्यथा जीव घेऊ, असे म्हणत युवा वकिलावर जीवघेणा हल्ला

न्यायालयातील खटला सोडून दे अन्यथा जीव घेऊ, असे म्हणत युवा वकिलावर जीवघेणा हल्ला

उस्मानाबाद : दिनांक १७ जुलै २०२१ रोजी ऍड. प्रथमेश सौदागर मोहिते, हे घटस्फोट खटला लढण्यासाठी न्यायालयात हजर होते. त्यांच्यासोबत पक्षकार डॉ. कांचन मोरे ह्या देखील हजर होत्या.

खटला संपल्यानंतर वकील प्रथमेश मोहिते हे आपली गाडी महिंद्रा टी. यु.वी गाडी क्रमांक- एम.एच. २५ ए.एल १८००, ही घेऊन घराच्या दिशेने निघाले होते.
त्यावेळी घटस्फोट खटल्यात प्रतिवादी असलेले, डॉ. अरुण मोरे व त्यांचे दोन सहकारी यांचा गाडीचा पाठलाग करत असल्याचे त्यांचा लक्षात आले.

तिन्ही आरोपी हे गाडीजवळ येताच त्यांनी गाडीत असलेल्या वकील श्री. प्रथमेश मोहिते यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला.

ह्या हल्ल्यात प्रथेमश मोहिते यांच्या तोंडाला व इतर अवयवांना देखील प्रचंड दुखापत झाली आहे.

त्यांना तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी वकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे उस्मानाबाद येथे भारतीय दंड संहिता
१८६० मधील कलम ३०७,३४१,५०६,१०९,४२७, ३४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी डॉ. अरुण मोरे व त्यांचे दोन सहकारी हे फरार असून , पोलीस त्यांचा अटकेसाठी प्रयत्न करत आहेत.

सदर घटनेमुळे मात्र वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

About The Author