एटीएम फोडणाऱ्या आरोपींना दोन वर्षाच्या कारावासासह प्रत्येकी 12 हजाराचा दंड

एटीएम फोडणाऱ्या आरोपींना दोन वर्षाच्या कारावासासह प्रत्येकी 12 हजाराचा दंड

 उदगीर( प्रतिनिधी) : उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 23 जुलै 2020 रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास नाईक चौक येथील एटीएम मशीनची चोरी करण्याच्या उद्देशाने चार आरोपीने प्रयत्न करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.त्या वेळी  गुरवबस प्रतापप्पा खंकरे सेवानिवृत्त सैनिक यांनी लगेच पोलिसांना यासंदर्भात कल्पना दिली. उदगीर शहरातील देगलूर रोडवर असलेल्या नाईक चौकात सदरील घटना घडत असल्याची माहिती मिळताच, शहर पोलिस स्टेशनचे रात्रीच्या गस्तीवर असलेले अहमद पठाण व महेश मुसळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.घटनास्थळीच  त्यांनी एका आरोपीस रंगेहात पकडले. दरम्यान तीन साथीदार फरार झाले होते.

 सदरील गुन्हा उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असल्यामुळे या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांना माहिती कळविण्यात आली. अवघ्या काही मिनिटात उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील नामदेव सारोळे, चंद्रकांत कलमे, तुळशीराम बरुरे ,राहुल गायकवाड, दयाराम सूर्यवंशी हे घटनास्थळी हजर झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी गुरुबस खंकरे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी रातोरात चोरट्यांचा पाठलाग करून अवघ्या चार तासाच्या आत आरोपीला अटक केली. याप्रकरणी आरोपी मंगेश देविदास जाधव, सिद्धार्थ धनराज ताटवाडे, दिगंबर मनोहर डोंगरे, शेख सिकंदर सय्यदसाब यांच्याविरुद्ध गुरनं. 286 /20 कलम 380, 511, 427, 34 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक घारगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. सदरील आरोपीता कडून योग्य ती तपासाची माहिती काढून घेऊन त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर उदगीर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर बी राऊ यांनी चारही आरोपींना दोन वर्ष तीन महिने कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 12 हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.

About The Author