वृक्षलागवडी बरोबर संगोपण म्हत्वाचे – तहसीलदार रामेश्वर गोरे
डोंगरशेळकी (प्रतिनिधी) :आपण वृक्ष लागवड प्रत्येक वर्षी करत आहोत, गतवर्षी लागवड केलेल्या जागी आपण परत त्याच खड्यात वृक्ष लागवड करताना पहात आहोत. वृक्ष लागवड करून फोटो काढण्या पैक्षा त्यांचे संगोपन करूण सेल्फी काढा. समाजात मान मिळेल असे उद्गार तहसिलदार रामेश्वर गोरे यांनी काढले.ते डोंगर शेळकी ता.उदगीर येथे मंदीर परीसरात वृक्ष लागवड करते वेळी संबोधीत होते.
यावैळी मंदीर विश्वस्त व्यंकटराव मुंडे,बाबुराव घटकार,समाधान कांबळे,व्यंकटराव मरल्लापले,तलाठी दत्ता मोरे,बालाजी मरल्लापले,ग्रामसेवक ज्ञानेश्वर उपासे,अविनाश बरूरे,गणेश मुंडे,एस पी मुंडे, भानुदास मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थानच्या वतीने करण्यात आला.
पुढे बोलतांना गोरे यांनी स्पष्ट केले की, वृक्ष लागवडी बरोबर वृक्षांचे संगोपना शिवाय पर्याय नाही. पुढील काळात वृक्ष लागवड करून लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे.वृक्ष लागवडी बरोबर ग्रामीण भागात पर्यावरण व आरोग्य जन जागृती अत्यंत महत्त्वाची आहे.
भविष्यात सुध्द हवा घेण्याकरीता वृक्षाची देखरेख करूण त्यांना मोठे करणे ही काळाची गरज आहे. हे मात्र नक्की.या कार्यक्रमाला गावातील नागरिक सामायिक अंतर राखुन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भानुदास मुंढे यानी केले तर आभार एस.पी.मुंडे यांनी मानले.