आझाद समाज पार्टी मध्ये शेकडो तरूणांचा प्रवेश

आझाद समाज पार्टी मध्ये शेकडो तरूणांचा प्रवेश

उदगीर (प्रतिनिधी) : आझाद समाजवादी पार्टीचे युवा आघाडीचे अध्यक्ष गौतम दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो तरुणांनी आझाद समाजवादी पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. याप्रसंगी लातूर जिल्हा उपाध्यक्ष समद भाई शेख, उदगीर तालुका युवक अध्यक्ष सागर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ उजेडकर, बंटी सोमवंशी यांच्यासह आजाद समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर युवक आघाडी ची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये शहराध्यक्ष म्हणून रियाज काझी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रमुख संघटक म्हणून गौस सैफ खान, सरचिटणीस म्हणून सय्यद साहेद, महासचिव म्हणून जहिरोद्दीन बाबर, सचिव म्हणून शेख इम्रान, उपाध्यक्ष म्हणून शेख समीर यांची नियुक्ती करण्यात आली.

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आझाद समाजवादी पार्टी आपले नियोजन करत असून स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी पक्ष संघटन बांधणी करून पक्षश्रेष्ठी सोबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती या प्रसंगी आझाद समाजवादी पार्टीचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी यांनी जाहीर केले.

About The Author

error: Content is protected !!