साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथे दि. १८ जुलै रोजी थोर विचारवंत, साहित्यिक, कवी, कलावंत, प्रबोधनकार व समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमोद नेटके व ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला अवधूत नेटके, मारुती शिंदे, सचिन नेटके, रामदास लोहार, गुणाजी कांबळे, विनोद नेटके, शिवशंकर शिंदे, सदानंद नेटके, शंकर कांबळे, प्रदीप नेटके, अंकुश लोखंडे, पप्पू कांबळे, पत्रकार प्रशांत नेटके यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!