लातुरात आठवणीतील स्व. संगमेश्वर बोमणे यांच्या नावाने संगम पार्क

लातुरात आठवणीतील स्व. संगमेश्वर बोमणे यांच्या नावाने संगम पार्क

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात गेली अनेक वर्षांपासून पासून स्व. संगमेश्वर बोमणे यांनी ग्रीन लातूर वृक्ष टीमला सातत्याने केलेल्या मदतीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष व
रोटरी क्लब ऑफ लातूर यांच्या सौजन्याने लातूर शहरातील बार्शी रोड परिसरातील विठ्ठल रुक्मिणी नगर येथील ग्रीन बेल्ट मध्ये आठवणीतील स्व. संगमेश्वर बोमणे यांच्या नावाने संगम पार्क विकसित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शहरातील विठ्ठल रुक्मिणी नगर येथील संगम पार्क येथे जवळपास २६० झाडे लावण्यात आली. त्यात आंबा, करंज, वड, पिंपळ, पेरू, सिंगापूर चेरी, टरमेनिलीया, कडुनिंब, बकुळ, सीताफळ, नारळ, आवळा, बेल, तुळस, कनेरी, टीकोमा, गुलाब, जास्वंद, लिली, तगर, स्वस्तिक अशी विविध प्रजातींची झाडे-फुलझाडे लावत झाडांना काठ्या लावण्यात आल्या तसेच झाडांचे वॉकिंग ट्रॅक करून ग्रीन बेल्ट च्या मध्यभागी मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या प्रत्येक सदस्यांनी संगम पार्कचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत १५० नवीन खड्डे खोदून व जेसीबीच्या सहाय्याने खोदलेल्या १०० खड्ड्यात मोठी झाडे लावून माती ओढण्यासारखे अत्यंत जिकरीचे कार्य करत नियोजनाप्रमाणे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वानी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी श्रीमती पूजा संगमेश्वर बोमणे, मनपा आयुक्त अमनजी मित्तल, जेष्ठ पत्रकार जयप्रकाशजी दगडे, नगरसेवक इम्रान सय्यद,
नगरसेविका रागिणीताई यादव, डॉ.पवन लड्डा, रोटरी क्लब लातूर चे सर्व पदाधिकारी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य यश रेसिडेन्सी येथील नागरिक, महिला भगिनी व संगम हायटेक नर्सरीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!