संत नामदेव विद्यालयाची दहावी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

संत नामदेव विद्यालयाची दहावी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

लातूर (प्रतिनिधी) : मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत लातूर येथील संत नामदेव विद्यालय शाळेचा निकाल 100% लागला आहे.

2021 च्या दहावी बोर्ड परिक्षेसाठी संत नामदेव विद्यालयातून एकूण 239 विद्यार्थी परीक्षेसाठी समाविष्ट झाले होते. त्यापैकी विद्यालयातील 90% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 31तसेच विशेष प्राविण्यासह 193 विद्यार्थी व 44 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यात जाधवर दिशा मनोहर या विद्यार्थिनीने 100% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. तसेच केंद्रे प्रवीण 99.60, बेंबडे नेहा 98.60, बेंबडे निकिता 98.40, केंन्द्रे दिशा 97.60, गडर अजिंक्य 95.60, सुरवसे अंकिता 94.60, तिडके गणेश 94.00, जटाळ वैभवी 94, साळुंके गणेश 93.80, गरड श्रीनिवास 93.80, ओमकार जाधव 93.60, नेहरकर साईराज 93.20, पांचाळ सायली 92.80, प्रसाद कृष्णकुमार 92.60, ऋषिकेश घुगे 92.60, मुंडे पायल 92.20, साळुंके वेदांत 92.20, पेदे संगमेश्वर 92, मंगुळे अनुज 92, पवार साक्षी 91.60, गणेश इंगोले 91.20, चव्हाण रविराज 91, मुंडे प्रशांत 90.80, गिरी शंतनू 90.80, जाधव हर्षवर्धन 90.60, गीते शरद 90.60, केंद्रे विश्वजीत 90.40, लहाने ज्ञानेश्वर 90. 40, राठोड सुरज 90.40, माने गीतांजली 90 टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव शिवाजीराव परगे, जिल्हा परिषद सदस्य सौ. अनिताताई शिवाजीराव परगे, मुख्याध्यापक श्रीमती बी एस, बोबडे आर एस, मुंजेवार, आयनुले, लव्हराळे, गरड, शिंदे, मोरे, चिंताडे, चिगुरे, दत्तनुरे, पाटील सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author