तिरू प्रकल्पावरील उजवा व डाव्या कालव्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

0
तिरू प्रकल्पावरील उजवा व डाव्या कालव्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

आ. संजय बनसोडे यांच्या मागणीला यश येणार

उदगीर (एल.पी.उगीले) :जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे हे सतत प्रयत्नशील असतात.
मतदारसंघामध्ये असलेल्या तिरू मध्यम प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यांची अवस्था खराब झाल्याचे आ.संजय बनसोडे यांच्या लक्षात येताच, शेतकऱ्यांना सिंचना साठी पाणी देण्यासाठी कालवा बांधकाम दुरूस्ती व कालवा अस्तरीकरण करणे आवश्यक असुन यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे माजी क्रीडामंत्री आ.संजय बनसोडे यांनी गेल्या महिन्यात केली होती.
त्या अनुषंगाने मुंबईत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाची विशेष बैठक घेवुन तिरु मध्यम प्रकल्पाचे बांधकाम हे १९७६ साली झाले असुन मागील ५० वर्षामध्ये हा तलाव ३१ वेळा पूर्णपणे भरला आहे. धरणाचे सिंचन क्षेत्र २३४८ हेक्टर असुन तलावास उजवा व डावा कालवा असे दोन कालवे आहेत. त्याची दुरुस्ती केली तर याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. यासाठी ४५-५० कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असुन या प्रकल्पाला आपण लवकरच तत्वत: मान्यता देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहे.
उदगीर, जळकोट मतदार संघातील शेतकरी हा सुखी व समृध्द झाला पाहिजे. आपल्या भागातील शेवटच्या माणसा पर्यंत पाणी पोहचले पाहिजे, आणि मतदार संघातील प्रत्येक शेतकरी हा संपन्न झाला पाहिजे. यासाठी माजी मंत्री व उदगीर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे हे सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या मागणीची दखल घेवुन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिरु नदीवरील कालच्या संदर्भात बैठक घेवुन सकारात्मक प्रतिसाद दिला असुन लवकरच निधी देवु असे सांगितले आहे.यासोबतच मतदार संघातील निडेबन, गुत्ती क्र.१, कोदळी, गुडसुर, धोंडवाडी, केकतसिंदगी, केसकरवाडी, हळद वाढोणा, बामाजीचीवाडी, करखेली, एकुर्का, चेरा साठवण तलाव १, चेरा साठवण तलाव २,डाऊळ हिप्परगा आदी गावातील साठवण तलावांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ.संजय बनसोडे यांनी केली असुन या बाबत लवकरच निधी उपलब्ध करुन देवु असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, संजय बेलसरे, सचिव लाभक्षेत्र, गवळी मुख्य अभियंता, घोगरे मुख्य अभियंता, मिसाळ मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!