कोरोना योद्धा लक्ष्मी करकरे यांचा सत्कार

कोरोना योद्धा लक्ष्मी करकरे यांचा सत्कार

 लातूर (प्रतिनिधी) : कोरोना योद्धा लक्ष्मी करकरे यांचा सत्कार प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर यांच्या वतीने करण्यात आला. लातूर तालुक्यातील गंगापूर आरोग्य केंद्र येथे कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मी करकरे यांनी जिवाची पर्वा न करता अत्यंत काटेकोरपणे कोरोना रुग्णांची सेवा केली. दरम्यान त्यांनादेखील कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. तब्बल 21 दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टर प्रताप इगे यांनी दिलेले औषध व आत्मशक्ती, आत्मविश्वास याच्या आधारावर त्या ठणठणीत बर्‍या झाल्या आहेत. बऱ्या होताच त्यांनी लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या समाजसेवीआणि सेवाभावी भूमिकेचा गौरव करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापुर तालुका लातूर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी जि प सदस्य सोनाली थोरमोटे, पंचायत समितीच्या माजी सभापती शीतल फुटाणे, गंगापूर चे सरपंच बाबू खंदाडे, पंचायत समिती सदस्य राम चामे, पंडित अडसूळ, शोभा बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सारडा,डाॅ. प्रताप इघे,डाॅ. ईश्वर काळे, रेणुका वाघमारे, श्रीमती सुडे, श्रीमती शिरसाट यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न झाला. ग्रामीण भागातून लक्ष्मी करकरे यांचे कौतुक केले जात आहे.

About The Author