मुलीनी बौद्धिक आणि मानसिक परिपक्वता प्राप्त करावी.- डॉ. संजय अस्वले

0
मुलीनी बौद्धिक आणि मानसिक परिपक्वता प्राप्त करावी.- डॉ. संजय अस्वले

उमरगा (एल.पी.उगीले)
आजच्या मुलींनी एक चांगली बहीण, कन्या, अत्या, आई, सासू बनण्यासाठी बौद्धिक आणि मानसिक परिपक्वता प्राप्त करावी. द्वेष आणि लोभ यापासून दूर राहावे. ज्यामुळे नातीगोती जपली जातील आणि कुटुंब व्यवस्था मजबूत होईल. यालाच महिला सबलीकरण म्हणावं असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ संजय अस्वले यानी केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभागातील वाणिज्य मंडळाच्या महिला सबलीकरण मुलीच्या कक्षा अंतर्गत जागतिक महिला दिन सप्ताह समारोपात “मुलींची महिला सबलीकरणसाठी भूमिका” या विषयावर चर्चा सत्राच्या अध्यक्षीय समारोपात डॉ अस्वले बोलत होते.
यावेळी महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना आजच्या काळात खरच महिला अबला आहेत की सबला? या प्रश्नावर आपण चर्चा केली पाहिजे. महिला म्हणुन जीवनाच्या प्रवासात अनंत अडचणी येतात. पण त्या अडचणीवर कशी मात करता येईल? यासाठी मुलीनी अभ्यास आणि निरीक्षण करावे. असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक ॲड. शुभदा पोतदार यानी केले. पुढे बोलताना ॲड. पोतदार यानी विद्यार्थिनींना कसे वागावे, आणि आपल्या संरक्षण साठी असलेले विविध कायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी योगिता इंगळे, विशाखा शेळके या विद्यार्थिनीनी आपली मनोगते मांडली. त्यानंतर खुल्या चर्चा सत्रात हुंडा, अत्याचार, न्यायालयीन विलंब, राजकीय हस्तक्षेप अशा अनिष्ट प्रथा आणि चालीरीती याबद्दल विद्यार्थिनीनी प्रश्न मांडले. त्याला या चर्चासत्रात मान्यवरांनी उत्तर दिले. या कार्यक्रमात सई भोसले या विद्यार्थिनीने दांड पट्टा आणि तलवार बाजी चे सादरीकरण केले.
यावेळी डॉ अजित अष्टे, विजयकुमार मुळे, खंडू मुरलीकर, ओमप्रकाश पवार, अक्षता बिरादार, राणी बेंबळगे, यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता मोरे, प्रास्ताविक श्रेजल पाटील आणि आभार मंजुषा बिराजदार यानी केले.
कार्यक्रमासाठी वाणिज्य मंडळाच्या महिला सबलीकरण समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!