तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा

तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा

डोंगरशेळकी (प्रतिनीधी) : मराठवाड्याचे प्रतिपंढरपुर म्हणुन आोळखले जानारे तिर्थक्षेत्र श्री समर्थ धोंडुतात्या महाराज संस्थान डोंगरशेळकी ता.उदगीर येथे आषाढी एकादशी निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशीला शासकीय महापूजा उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते सपत्नीक  झाली. तर महाआरती डि.वाय.एस पी लंजीलेयांच्या हस्ते सपत्नीक  करण्यात आली.महापूजा व आरती झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतिने तहसीलदार रामेश्वर गोरे व डि.वाय.एस पी लंजीले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावैळी उपस्थित मंदिर महंत अनिल महाराज,विश्वस्त व्यंकटराव मुंडे,बाबुराव घटकार,सपोनी बाळासाहेब नरवटे,तलाठी दत्ता मोरे,गणेश मुंडे,बालाजी मरल्लापले,व्यंकटराव मरल्लापल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला प्रतिसाद देत मंदिर संस्थान कमिटिने कोरोना महामारी मुळे संसर्ग वाढु नये म्हणुन  भाविका करिता दर्शनासाठी मंदिर पुर्णत: दिवसभर बंद ठेवन्यात आले होते. या एकादशीला शेजारील राज्य कर्नाटक,तेलंगणा,आंध्रप्रदेश आदी सह भावीक मोठ्या प्रमाणात येत असतात.तसेच पंचक्रोशीतील येनार्‍या सर्व भाविक भक्तानी आषाढी एकादशी समर्थाच्या दर्शनासाठी येउ नये असे आवाहन संस्थानच्या वतिने करण्यात आले होते. त्याला भाविक भक्तांनी प्रतिसाद ही दिला. वाढवना पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळसाहेब नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली  दिवसभर  मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About The Author