वरवंटी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग व दलित वस्ती विकास निधीत भ्रष्टाचार
झालेल्या कामाची चौकशी करण्याची उपसरपंचांनी केली मागणी
अहमदपुर( गोविंद काळे) : राज्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ग्रामीण भागात विकास व्हावा म्हणुण ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. परंतु त्यात भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. अहमदपुर तालुक्यातील वरवंटी ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगातील निधीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन वरवंटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरवंटी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी एकमेकांच्या सहमतीने चौदावा विित्त आयोग व दलीत वस्ती विकास निधीतुन कसलेही काम न करता सदरील कामाचे बील उचलले आहे. तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंच पदाची निवड झाल्यापासुन आजपर्यंत एकही मासीक बैठक घेतली नाही. व केलेल्या कामच्या संदर्भात कसलाही ठराव न घेता बील उचलले आहेत. तरी ग्रामपंचायतीच्या बँकेच्या खात्याची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकट:
वरवंटी व वरवटी तांडा येथील आर.अो.पाणी प्लँन्ट, दलित वस्ती नाली बांधकाम, दलित वस्तीतील बोअर, कोरोना काऴात साहित्याचे वाटप न करता बील उचलणे, अंगणवाडी ई-लर्निंग न करता बील उचलणे, जिल्हा परिषद वरवंटी व वरवंटी तांडा येथे कसलेही साहित्य न देता बील उचलणे, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत गँस कनेक्शन करीता वापरात आलेला पैसा, विद्युतीकरण अादी कामच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.