किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयात क्रांती ज्योती साविञीमाई फुले यांना विनम्र अभिवादन
किनगांवात महिला शिक्षण दिनाने जयंती साजरी
किनगांव (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३ जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिनाने उत्साहात सोमवार दि ४ जानेवारी रोजी ठिक 11 वाजता महाविद्यालयात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भारत भदाडे होते तर प्रमुख उपस्थिती प्रा.डॉ. बी. आर बोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.बालाजी आचार्य,गुणवत्ता हमी पक्षाचे समन्वयक प्रा.प्रभाकर स्वामी प्रा.संजय जगताप, प्रा.विठ्ठल चव्हाण प्रा.बळीराम पवार, प्रा.डॉ. विरनाथ हुमनाबादे ,प्रा.अजय फड, प्रा.डॉ दर्शना कानवटे प्रा. पद्मजा हगदळे, प्रा.सदाशिव वरवटे, प्रा. पांडूरंग कांबळे, प्रा. अनंत सोमुसे,कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे,उमेश जाधव, इंददेव पवार अनिल भदाडे, शिवाजी हुबांड किशन धरणे, आखिल शेख आदीसह रासेयो विद्यार्थीनी कु शितल कचरे, कु अंकिता चावरे, कु. मुसळे, कु गिता पोटफोडे आदि उपस्थित होत्या यावेळी प्राचार्य डॉ.भारत भदाडे यांनी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहाराने करून विनम्र अभिवान केले यावेळी प्रस्ताविक करताना प्रा.बालाजी आचार्य म्हणाले की, सामाजीक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीमाई यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेताना स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ सावित्रीमाई फुलेनी रोवली म्हणून आज मुली उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान होत आहेत यांचे सर्वश्रेय सावित्रीमाईलाच आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संजय जगताप यांनी केले तर शेवटी आभार रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा बालाजी आचार्य यांनी मानले.