पंढरपुर येथील जी.प.शाळेला मुन्ना पाटील यांच्याकडून एक्कावन हजाराची देणगी

पंढरपुर येथील जी.प.शाळेला मुन्ना पाटील यांच्याकडून एक्कावन हजाराची देणगी

उदगीर ( एल.पी.उगीले ) : येथील विकास पुरूष उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी जिल्हापरिषद शाळा, पंढरपुर ता. देवणी येथे  सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेची पाहणी करून व उपसरपंच राजकुमार हसनाबादे व मुख्याधपक व सर्व गावकर्‍यांसमवेत चर्चा करून देवणी तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा, पंढरपूर बाला उपक्रमातुन नंबर १ यावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर चे सभापती श्री. सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटिल यांनी 51000 हजार रूपयेची मदत केली. यावेळी उपसरपंच राजकुमार हसनाबादे, मुख्यधापक व गावकरी मंडळींनी आभार मानले.

शिक्षणाबद्यालची प्रचंड आवड आणि ग्रामिण भागातून दर्जेदार शिक्षण मिळावे.या उदात्य हेतुने सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी केलेल्या या सहकार्याबद्यल परिसरातून अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!