विलास सिंदगीकर यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतिने सत्कार
अहमदपूर ( गोविंद काळे ) : विलास सिंदगीकर यांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाराष्ट्रातील सुप्रसिध्द साहित्यिक विलास सिंदगीकर यांची नुकतीच राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, आखिल भारतीय मराठी साहित्य महमंडळाचे अध्यक्ष मा. प्राचार्य.कौतिकराव ठाले – पाटील यांच्या शुभहस्ते परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. परिषदेच्या डॉ.ना.गो नांदापुरकर सभागृहात मराठवाडा साहित्य परिषद केंद्रिय कर्यकरणीच्या सर्वसाधारण सभेत आज बुधवार दिनांक 21-7-2021 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी परिषदेचे कार्यवाह प्रा .डॉ .दादा गोरे,उपाध्यक्ष प्रा.किरण सागर, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके , उदगीर येथील 40 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. ऋषिकेश कांबळे, प्राचार्य कमलाकर कांबळे, माजी प्राचार्य सुरेश जाधव, प्रतिष्ठानचे संपादक तथा जेष्ठ कथाकार आसाराम लोमटे, कवी देविदास फुलारी, कवयित्री संजीवनी तडेगावकर, कथाकार प्रा.भास्कर बडे, मा.दगडु लोमटे, नितीन तावडे, डॉ.रामचंद्र काळुंखे , जीवन कुलकर्णी, हेमलता पाटील यांची उपस्थिती होती. विलास सिंदगीकर हे साहित्याच्या माध्यमातून माय- मराठीची सेवा करत आहेत. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण, दलित, आदिवासी , भटक्या विमुक्त समाजाचे दुःख आणि वेदना मोठ्या ताकदीने जगाच्या वेदीवर मांडल्या आहेत. विलास सिंदगीकर हे कथा-कथनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून ते मराठवाडा साहित्य परिषदेसाठी कौतुकाची बाब आहे. आशा शब्दात ठाले पाटील यांनी सिंदगीकर यांचे सत्कराप्रसंगी कौतुक केले. या यशाचे श्रेय मराठी साहित्य रसिक आणि मराठवाडा साहित्य परिषदेलाही जाते. मराठवाडा साहित्य परिषदेने कार्याची दखल घेऊन सत्कार केला त्याबद्धल साहित्य परिषदेच्या रूनात राहू इच्छितो आशा शब्दात सिंदगी यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा.डॉ.दादा गोरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण सगर यांनी केले, तर आभार कुंडलिक अतकरे यांनी मांडले.